धुळे शहरातील सहजीवन नगर येथील रहिवासी आणि युवा उद्योजक शुभम सिंघवी यांचा आज गणेश विसर्जन करून घरी परत येत असताना मुंबई–आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
धुळे शहरालगत असलेल्या या महामार्गावर शुभम सिंघवी यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे विसर्जन तापी नदीपात्रात उशिरापर्यंत होत असते. याचसाठी शुभम आज सकाळी दुचाकीने तापी नदीपात्रात गेले होते. मात्र परत येत असताना झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा